परसा सांगे स्रियेपाशीं
Like
Like Love Haha Wow Sad Angry

namdevache-abhang5

नामदेवांनी दिलेल्या उत्तरातील अभंगा नंतर संत परसा भागवत आपल्या पत्नी जवळ संवाद करतात त्याचे वर्णन अभंगाद्वारे !

परसा सांगे स्रियेपाशीं । अवो अपूर्व वर्तले पंढरीसीं ।
मज आणि नामयासी ।जाला विवाद परस्परे ।।
परसा सांगे आपुला महिमा। आजी फजित केला नामा ।
पुढती शरण आला आम्हां । सकळ जना देखतां ।।
आमि तयासि निर्भत्सिले ।परी ते आमच्या पायी लागले ।
काकुळती शरण आले ।मग सोडिलें  तयातें  ।।
आम्ही साक्षात विष्णुदास । त्याने म्हणवावे विप्रदास ।
एसें असावे प्रत्यक्ष । विष्णुदास का म्हणवी ।।
तुं म्हणसी एक नामा ।येर वाउगीच उपमा ।
त्यापाशीं असतां परमात्मा । तरी कां आम्हां शरण येतां ।।
खालील पायरी त्याची जाणं ।वरी आम्हासी महिमान ।
आमुच्या हृदयी परमात्मा आपण । सदा जागृत वसतसे ।।
धन्य धन्य माझे कुळगोत्र ।नाम पावलों भागवत ।
केलियां पुण्या नाहीं मात । आणि वेदांत मी जाणे ।।
यातीहीन विष्णुदास म्हणविती । तेणे तें नर भय पावती ।
त्यासी न चुके पुंनरावृतत्ति । विष्णूदास म्हणे परसा ।।८।।

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Menu