Mamtwa Rupi Akarshan, Mamtwa Rupi wrukshacha Akarshan, read full articles baesd on humen being nature.
देहातील —-ममत्वरुपी वृक्ष [ ममत्वरुपी वृक्षाचा उत्कर्ष ]
ममत्वरुपी जो बुद्धीचा ‘भाव’ हाच दुख भोग आणि ममत्वरुपी जो बुद्धीचा ‘अभाव’ हाच सुख भोग जाणावा. बुद्धीच्या ठिकाणी ममत्वांचे आवरण झाल्यामुळे आत्म स्वरूपाचा लोप झाला असून त्या योगे मी जीव आहे. मी भोक्ता आहे.असा हा एक त्यापासून ‘अंकुर’ उत्पन्न होवून अज्ञानरुपी ‘उदक’ सहाय्याने ममत्वरुपी वृक्ष फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ** ममत्वरुपी वृक्षाचा विस्तार मी हा अमुक आहे हा ममत्वरुपी वृक्षाचा ‘अंकुर’ जाणावा. हे माझे आहे,हे या वृक्षाचे ‘बुड’ जाणावे, घर आणि उपजीवन सामुग्री (धनसाधन) ह्या या वृक्षाच्या मोठ्या ‘शाखा’ जाणाव्या. स्री-पुत्र, कुटुंब-वत्सलादि या ममत्वरुपी वृक्षाच्या ‘पल्लवी बारीक फांद्या ‘जाणाव्या. धनधान्य ऐशवर्यादि हि ममत्वरुपी वृक्षाची ‘पाने’ जाणावी. पाप-पुण्य हि ममत्वरुपी वृक्षाची ‘पुष्पे’ जाणावी. आणि सुख-दु:ख हि त्या ममत्वरुपी वृक्षाची ‘फळे’ जाणावी. ह्या फळांची जी रुची, याचा जो संसर्ग तोच ‘संसार’जाणावा. या संसारा संबंधी कर्मकर्तुत्वादि धर्मात्मक जी क्रिया तीच ‘बुद्धी’ जाणावी. धन-पुत्रादी पुष्टीदायक जो सुखाचा आनंद हेच विश्रांती स्थान म्हणजे हीच ‘वृक्ष छाया’ जाणावी.
वृक्ष छेदाचे साहित्य दांडा,कुर्हाड,धार हे पाहिजे.या वाचून वृक्षावर धाव करता येणार नाही.
१) दांडा (Danda) :- श्री सद्गुरूला साक्षात परब्रम्हस्वरूप जाणून त्यांच्या वचनांवर संपूर्ण विश्वास ठेवणे हा ‘दांडा’ जाणावा.
२) कुर्हाड (Kurhad)-: सद्गुरूच्या ठिकाणी शुद्ध अंत: करणयुक्त श्रद्धा भक्तीने त्यांच्या कल्पनारहित अनन्य भावाने दृढ निश्चय ठेवणे.हीच ‘कुऱ्हांड’ जाणावी.
३) धार (Dhar)-: लोकेषणा,आत्पेषणा,वितेषणा व देह धारणा यांच्या कडे लक्ष न देता,विधी किंवा निषेध न पाळता सद्गुरू वचनच सत्य आहे.असा पूर्ण निश्चय करून शंकारहीत श्री सद्गुरूच्या मर्जी प्रमाणे क्रिया करणे हि त्या कुऱ्हांडीची तीक्ष्ण’धार’ जाणावी.
४) घाव (Ghaw)-: स्द्गुरुनाथाची ज्या ज्या वेळी जी जी आज्ञां होईल त्या त्या आज्ञे प्रमाणे सुख-दु:खांदिक देह जन्य भीतीचा त्याग करून, शुद्ध अंत:कर्णाने क्रिया करून सद्गुरू कृपेस पात्र होणे हा त्या ममत्वरुपी वृक्षा वरचा मोठा ‘घाव’ जाणावा.याच प्रमाणे ममत्वरुपी वृक्षाचा छेद करून ‘मनोलय’ करावा.
Source : Marathi Unlimited.