511
Ata Uthau Sare Ran, Ata Petawu Sare Ran. 
देश भक्ती वर गीत …… (कवी– साने गुरुजी)
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्यांच्या रक्षणा साठी , लावू पणाला प्राण …. आता उठवू …..
किसान मजूर उठतील ,कंबर लढण्या कसतील
एक जुटीची मशाल घेऊन पेटवतील हे रान …. आता उठवू…..
कोण आम्हा अडविल, कोण आम्हा रडविल
अडवणूक करणार्यांची , उडवू दाणादाण ….. आता उठवू…….
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती गाती, स्वातंत्र्याचे गान …आता उठवू ….
पडून ना राहू आता,खाऊ ना आता लाथा
शेतकरी, अन कामकरी, मांडणार हो ठाण …. आता उठवू …..
Source: Marathi Unlimited.
511