अजित दादा पुन्हा बसले गादीवर

Like Like Love Haha Wow Sad Angry अजितदादा (Ajit Pawar) ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात परतल्यानंतर कोणती खाती सांभाळणार हे...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

अजितदादा (Ajit Pawar) ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात परतल्यानंतर कोणती खाती सांभाळणार हे आता स्पष्ट झालेलं होत . मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर अजित दादा पुन्हा एकदा सर्वात महत्वाची  खात्यांची सूत्रं सांभाळणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे . राजभवनात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याक़डून अजित दादा यांनी  पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील जवळपास सगळेच मंत्री यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यावर विरोधकांनी मात्र चांगलाच  बहिष्कार घातला होता. विरोधकांपैकी कोणताही नेता उपस्थित नव्हता. २५ सप्टेंबरला अजित यांनी दिला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा… ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची ( Deputy CM ) शपथ… केवळ ७२ दिवसांत घडलेलं हे नाट्यं… मग राजीनाम्याचा राजकीय भूकंप कशासाठी आणि कुणासाठी होता? ७० हजार कोटींचा सिंचन करारातील  घोटाळा केवळ ७२ दिवसांत हा घोटाळा जनतेच्या विस्मृतीत जाऊ शकतो का?. दादांनी स्वत:लाच क्लिन चीट दिलीय का? असे बरेच प्रश्न आता विरोधक करत आहेत. त्याचं या पुनर आगमनाला मात्र विरोधकांनी चांगलाच बहिष्कार घातलेला आहे.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories