”सत्य, मंगल हि बोला”




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Read Marathi articles only from Marathi Unlimited. the best source of Marathi articles.

                                Satya Mangal Hi Bola.

satya mangal hi bola

जे भोजन आपण मुखा द्वारे आत ग्रहण करतो. तेच अन्न आपल्या शरीराचा सत्वांश हिस्सा आहे. पात्रात वाच लेले अन्न आपले सर्वांश बनू शकत नाही.तसेच शब्दाचे हि आहे ज्या शब्दांना आपण बोलताना ज्या शब्दांना जिभेवर स्थान देतो. तेच आपले स्त्वांश बनतात. जे शब्द आपण उच्चारत नाही ते आपले स्त्वांश बनत नाही. आपण कुणाची निंदा करताना ज्या अपशब्दाना जिभेवर स्थान देतो.तेच आपले स्त्वांश बनून जातात. एखा द्यास आपण दोषी ठरवून त्याचे काढतो. तेच शब्द आपल्या मनात स्थान प्राप्त करतात. तेच शब्द आपली शांती व सुख भंग करितात. हे शब्द आपले ध्यान आपल्या उन्नतीला आपल्या दूर घेवून जातात. आपल्याला नुकसान पोचवितात. म्हणून त्याचे दोष न काढता फक्त ती सुधारण्याची कला समजून दिली पाहिजे. दुसरा दोषी असण्यापेक्षा तो दोष आपल्याच मनात प्रथम तयार होतो हे लक्षात घेतले पाहिजे. कठोर शब्दाने कुणाला आघात पोहचवून शत्रुता मिटत नाही,व कुणी समजूनहि घेत नाही.आपल्या मानव क्षेत्रात प्रथम समता स्थापित केली तरच कडवे शब्द नेहमी विषमता प्रगट करतात. आपल्या मुखातील उत्तम,मंगल शब्द जीवनात सुख आणि समृद्धी आणतात.व हिंसात्मक, अप्रिय शब्द अव्यवस्था तयार करतात. क्रोधीत शब्दांनी आपल्या पचन शक्तीत बाधा निर्माण होते. व शरीरातील अन्य क्रियान मध्ये उथल – पुथळ  निर्माण होते. आपल्या जीवनाचे मुळ लक्ष जे आहे त्या कडे दुर्लक्ष होऊन आपल्याला हानी पोह्चू शकते. आजच्या या जीवनात उत्साहवर्धक शब्दांची फार आवश्यकता आहे. हे कोण करू शकते? तुम्ही, मी, आणि आपण.  प्रेम, सद्भावना, क्षमा याने परिपूर्ण शब्दाचा वापर करून संपूर्ण विश्वात शांती आणणे व मानवाच्या सद भावनेची वृद्धी करण्या सारखे कार्य हाती घेतलेच पाहिजे.ह्यालाच प्रभू प्रार्थनेला मदत केल्या सारखे होतें.

Source : Marathi Unlimited.

Read Marathi articles only from Marathi Unlimited. the best source of Marathi articles.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu