सरकार आता सामन्यांची दिवाळी सुद्धा उधाडूल लावणार आहे. सामन्यांवर सरकारे पुन्हा एक नवा बोंब टाकला आहे. विना अनुदानित घरगुती गॅस दरात आज सरकारने २६ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाजारात आता गॅस सिलिंडरसाठी एक हजाराच्या घरात पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयानुसार स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्या गॅस सिलिंडरची मूळ उत्पादन किंमत ९९६ रुपये आहे. मात्र, सरकारकडून ते ग्राहकांना सवलतीच्या दरांत ४०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाते. यामुळे सरकारला अनुदानित सिलिंडरमागे 570 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.
Source : Marathi Unlimited.