धर्म गीत

Like Like Love Haha Wow Sad Angry 2 खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।धृ।। जगी जे हीन...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

dharm geet

खरा तो एकची धर्म । जगाला प्रेम अर्पावे ।।धृ।।
जगी जे हीन अति पतित । जगी जे दिन पददलित ।
त्या जाउनी उठवावे । जगाला प्रेम अर्पावे ।। १।।
सदा जे आर्त अतिविकल । ज्याना गाजती सकल ।
त्या जाउनी हसवावे । झाला प्रेम अर्पावे ।।२।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे । कुणा ना व्यर्थ हिणवावे ।
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे ।।३।।
प्रभूची लेकरे सारी । त्याला सर्वही प्यारी ।
कुणा ना तूच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे ।।४।।
असे हे सार धर्माचे। असे हे सार सत्याचे ।
प्रार्था प्राण हि द्यावे ।जगाला प्रेम अर्पावे ।।५।।

कवी :  साने गुरुजी

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Related Stories