करीना कपूर लग्नानंतर धर्मांतर करणार का असा प्रश्न बरेच तिच्या चाहत्यांना आला होता. अभिनेत्री करीना कपूर हिने आज अभिनेता आणि पतौडी संस्थानचा नवाब सैफ अली खान याच्याशी विवाह केला. मात्र तरीही तिने सैफ अली खानचा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिला असून ते सैफने मान्यही केले आहे. मात्र करीना कपूर आपल्या सासू शर्मिला टागोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुस्लिम धर्म स्वीकारेल असा सर्वांचा होरा होता. मात्र करीनाने धर्मांतरास नकार दिला आहे. करीनाने लग्नापूर्वीच ही अट घातली होती आणि ती सैफने मान्यही केली आहे. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंगने देखील लग्नात मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मूळची शीख असणाऱ्या अमृताने १९९१ साली सैफ अली खानशी गुप्तपणे विवाह केला होता. मात्र करीनाने धर्मांतरास नकार देण्याचं धाडस दाखवून नवा पायंडा पाडला.
Source : Marathi News Tv.
Read Full story about the karina and saif ali khans marriage. will karina change her religion? .stay with Marathi unlimited for latest News stories.