प्राचीन काळी अनेक जीवनावश्यक गोष्टी पुरविणारे फळ या दृष्टीने नार्लाकडे पाहिले जात असे. आजही नारळातील विविध घटक स्वास्थ्यावश्यक समजले जातात. नारळाचे तेल, खोबरे, पाणी एर्केच नव्हेतर करवंटी सुद्धा उपयोगी आहे. नारळाचे पाणी स्निग्ध, मधुर, शुक्रवर्धक थंड गुणाचे असले तरी ते शरीरात फाजील चरबी वाढवत नाही. ते तहान, पित्त आणि वायुच्या विकारांवर उपयुक्त आहे. शहाळ्या मध्ये ग्लुकोज, प्रोटीन हि द्रव्ये अधिक असतात. त्यामुळे नारळाचे पाणी वापरायचे असेल तर कोवळ्या श्हालाचेच पाणी योग्य ठरते. गोवर, कांजण्या, गर्मी, परमा, लघवीची आग, लघवी कमी होणे, मुतखडा,युरिनरी ईन्फ़ेक्श्न, घाम खूप येणे, तोंड येणे. या विकारात शहाळ्याचे पाणी चांगलेच उपयोगी ठरते. लघवी कमी होण्यासाठी नारळाचे पाणी योग्य आहे; पण मार्गाव्ररोधाची तक्रार असल्यास त्या व्यक्तींनी नारळाचे पाणी पिवू नये. आमच्या लहानपणात जेष्ठ असे वैद्य सांगायचे नारळाच्या करवंटीला जाळल्याने त्यातून एक प्रकारे लालसर तेल निघायचे त्या तेलाला गजकर्ण किंवा कातरणी च्या घर्षणाने त्वचेवर एक प्रकारे फुन्श्या तयार होऊन त्याचे मोठ्या फोडांत रुपांतर होत. व ती फोडे त्वचा चिघळत असे. त्यावर हे करवंटी जाळल्याने निघणारे तेल लावन्याचा सल्ला देत हे फार गुणकारी आहे, त्या करीता वाळलेले पण फार जुने नारळ नको त्यापासून तेल निघत नाही, असे हे बहु गुणकारी औषधि गुणधर्माने युक्त असलेले नारळ,निसर्गाने मानवाला दिलेला अनमोल ठेवाच आहे. हा बर्याच ठिकाणी उपजीविके साठी सुद्धा वापरतात, तसेच देवपूजेत याला फार मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.
Source: Marathi article.