पत्रकारांशी बोलता असतांना राजकारण म्हणजे घाणीचे साम्राज्य असे वक्तव्य श्री अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. अण्णाआज पत्रकारांशी चर्चा करताना, ‘आंदोलनात राजकारणाचा पर्याय आपण मांडला नव्हता’ असं अण्णा हजारेंनी स्पष्टपणे म्हटलंय. उलट जेव्हा हा प्रस्ताव आला, तेव्हा आपण काही गोष्टींचे खुलासे मागितले होते. ते आपल्याला देण्यात आले नाहीत, असं म्हणत अण्णांनी केजरीवालांना टोमणा मारलाय. राजकीय पक्ष हा आंदोलनाचाच एक भाग आहे, असं केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. अण्णांच्या आणखी एक सहकारी किरण बेदी यांनीही केजरीवाल यांचा पक्ष आंदोलनाची ताकद वाढवणारा असल्याचं म्हटलं होतं.
Source : Marathi News Tv