सरकारतर्फे महात्मा गांधींना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी देणं असंवैधानिक असल्याचं केंद्रिय गृहमंत्रालयाने मान्य केलं आहे. भारतीय संविधन शिक्षण आणि लष्कर या क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कुणासही पदवी देण्यास परवानगी देत नाही. ऐश्वर्या पराशर नामक विद्यार्थिनीने माहितीच्या अधिकारातून राष्ट्रपतींकडे यासंदर्भातला प्रस्ताव पाठवला होता. यावर तिला मिळालेल्या उत्तरात असं स्पष्ट केलं आहे , की कलम १८ (१) अंतर्गत शिक्षण आणि सैन्यातील व्यक्तींशिवाय इतर कुठल्याही व्यक्तीच्या नावाला पदवी लावणं बेकायदेशीर आहे. माहितीच्या अधिकाराचा वापर करत तिने एका याचिकेत महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणण्यामागचं कारण विचारलं होतं. हे प्रस्ताव तिने तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पाठवला होता.
Source : Marathi Unlimited.
Stay with Marathi Unlimited for selected news and latest stories. world Best News source. Read all latest news Updates.