बहुगुणी डिंक

Like Like Love Haha Wow Sad Angry घरगुती औषधउपचार किंवा आयुर्वेदिक औषधे घेणार्यांचे एक ठाम मत असते. या औषधाचे काहीच...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Gum Arabic Productsघरगुती औषधउपचार किंवा आयुर्वेदिक औषधे घेणार्यांचे एक ठाम मत असते. या औषधाचे काहीच साईड ईफेकट्स नसतात.हे जवळ जवळ सर्वच म्हणताना दिसतात, कृत्रिम रासायनिक औषधांसारखे विघातक परिणाम नसले तरी या नैसर्गिक औषधांमुळे त्रिदोषांनपैकि एखादा वाढणे,कमी होणे, उष्णता वाढणे,असे परिणाम होतातच  त्या साठी घरगुती किंवा आयुर्वेदिक औषधी ती ज्या अनुपाना बरोबर (पदार्थान बरोबर ) घ्यायला सांगितली असतील तशीच घेतली तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो…. वड, पिंपळ, बाभूळ, खैर यांसारख्या वृक्षातून निघालेला आणि वाळलेला चिक म्हणजेच खाण्याचा डिंक. यातही खैराचा डिंक उत्तम प्रतीचा असतो, चमकदार असणारे पिवळ्या पांढरया खड्यांच्या स्वरूपात हा डिंक नेहमी घरात असावा.बारीक-सारीक तक्रारींवर डिंक उपयुक्त ठरतो. तोंड येणे, पोटात आग पडणे, छातीत जळजळणे, कोरडा खोकला आणि आवाज बसने यांसारख्या तक्रारी डिंकाचे चार,सहा खडे वेगाने दूर करतात. डिंकाचे दोन खडे चघलल्यास खोकला त्वरित दूर होतो. ईत्र्वेला चार-पाच खडे पावकप  पाण्यात विरघळून त्यात दुध,साखर घालून प्यायल्यास जळजळ ,तोंड येणे, पोटात आग पडणे यावर आराम पडतो. … (डिंकाचा लाडू व बाळंतीनी हे समीकरण असले तरी कमजोर हाडे, पाठ दुखी, कंबर दुखी साठी अगदी पुरुषांनीही अवश्य डिंकाचा लाडू खावा.) लाडू एवजी दिंकाची खीरही  तेवढीच गुणकारी ठरते.हे उत्तम घरगुती टॉनिकच म्हणावे लागेल. या खेरीज नेत्र विकार, भाजणे त्वचे वरील काळे डाग, या साठी डिंक उगाळून तयार केलेला लेप त्वरित आराम देतो; मात्र डिंक उष्ण असल्याने त्याचे सेवन दुधा-तुपा बरोबरच करायला हवे. एरव्ही एक आजार जावून उष्णतेच्या दुसर्या आजाराला तोंड द्यावे लागते. यात तसे नाही. असा हा बहुगुणी डिंक आहे.

Source : Marathi Unlimited.

Read Usage of the Glue Made from the Tree.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories