Mind and will power, How to increase your will power and strength of the mind, tips on will power read more about the memory power strength.
”नथिंग बट पोटेन्शियल ऑफ एव्हरीथिंक” अशी मनाची एक व्याख्या केली जाते. शक्ती फार मोठी आहे. असे महान ऋषी मुनींनी सांगितले आहे. हे रिकामे मन आपण भरतो त्या विचारांनी व्यापले जाते. आणि कालांतराने आपल्यालाच छळते. विज्ञांनाला अगम्य असणार्या काही गोष्टी समजावून घ्यायच्या तर विज्ञांनाच्या कक्षेत बसणारयां काही संकल्पना गृहीत घराव्या लागतात. विज्ञांनाणे उर्ज्या मान्य केली असली तरी वैश्विक उर्ज्या विज्ञांनाला मान्य नाही. विश्वाच्या उत्पत्तीचे नियम लावत वैज्ञांनिक उष्णता, अणू, परमाणु. यांचा विचार करतात. अगम्य मनाची ताकद ओळखण्यासाठी आपल्याला मात्र स्पंदन म्हणजेच तरंग या कल्पने वर विश्वास ठेवावा लागतो. या विश्वात असणार्या प्रत्येक गोष्टीतून विशिष्ट प्रकारचे तरंग निघत असतात हे तरंग काही वेळा चांगले म्हणजे सकारात्मक तर काही वेळा त्या विरुद्ध म्हणजे नकारात्मक असतात. नकारात्मक व्यक्ती काय गमविले त्याचा विचार करीत कुरकुरत राहतात, तर सकारात्मक विचारसरणीच्या व्यक्ती काय कमवायचे याचा विचार करून तातडीने कामाला लागतात.
या दोन वेगवेगळ्या तरंगां बाबत सावध असणे म्हणजेच मनाची ताकद ओळखणे होय. नकारात्मक गोष्टींचा सतत संपर्क किंवा सतत नकारात्मक विचार हे अधिक जड जाते. तर सकारात्मक, उत्फुल्ल गोष्टींचा श्वास किंवा सकारात्मक विचार मनाला हलकेपणा देतात. स्थूल शरीरा प्रमाणेच जड मन निष्क्रिय बनते तर हलके मन चपळ, सक्रीय आणि कार्यक्षम बनते, संयमाने मनाला आवर घालून त्याला योग्य वळण लावता येते. ‘मन करारे प्रसंन्न, सर्व सिद्धींचे कारण ‘ या शब्दात संतांनी मनाची बहुमोल अशी प्रचंड ताकद व्यक्त केलेली आहे. तेव्हा प्रथम मनाची मरगळ झटकून कार्याला लागायचे असते हे महत्वाचे असते. एकदा चालायला सुरवात केल्यावर कोणतेही, व कितीही उतुंग शिखर असले तरी ते पार होणारच. हार त्याच्या वाट्याला कधीच नसते.
Source : Marathi articles Sangrah.