गेल्यावर्षी लालबागच्या राजाच्या तिजोरीत ८ कोटी रुपये जमा झाले होते. यंदा हा विक्रमही मोडला जाण्याची शक्यता आहे. दरवर्षी दान केलेल्या वस्तू आणि रुपयांचे विक्रम मोडणार्या लालबागच्या राजाच्या तिजोरीत यंदा शुक्रवार सकाळपर्यंत ६ कोटी ५0 लाख जमा झाले.
गणेशोत्सवामध्ये राज्यभरातून भक्तगण राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. पहिल्या तीन दिवसात सुमारे सतरा लाख भाविकांनी राजाचे दर्शन घेतले. पाच दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनानंतर भक्तांची गर्दी वाढली. अखेरच्या दोन दिवसामध्ये आणखी दहा लाख भाविकांनी राजाचे दर्शन घेतले.
यंदा पहिल्या दोन दिवसांमध्ये राजाच्या तिजोरीमध्ये ८५ लाख रुपये जमा झाले होते. शुक्रवार सकाळपर्यंत राजाच्या तिजोरीमध्ये ६ कोटी ५0 लाख रुपये जमा झाल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार राजेंद्र लांजवळ यांनी दिली.
Source : Marathi Unlimited.
Read More :
* Lalbaugcha Raja Album from 1934 to 2009