अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणार्या संयुक्त प्रवेश परीक्षेमध्ये (जेईई) राज्याने सामील होण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. आधी राष्ट्रीय पातळीवरील ‘एआयईईई’ आणि राज्य पातळीवरील ‘एसईईई’ अशा दोन परीक्षा द्याव्या लागत होत्या. प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे २0१४-१५ पासूनचे प्रवेश हे संयुक्त प्रवेश परीक्षा आणि इयत्ता बारावीमध्ये विद्यार्थ्यांनी संपादित केलेले गुण याच्या आधारे करण्यात येणार आहेत. या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या दर्जानुसार पुढील वर्षापासून बारावीच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात येणार आहेत. इयत्ता बारावीमध्ये मिळविलेल्या गुणांपैकी ५0 टक्के गुणांचे वेटेज ठरविताना विद्यार्थ्याने केवळ भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये मिळविलेल्या गुणांचाच विचार करण्यात येईल.
Source : Marathi Unlimited.