सोन्याचा भाव आता प्रतीतोळा ३१,०७७ रुपये इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी अचानक वाढल्याममुळे सोन्याची किंमत वाढली आहे. २०१२ या वर्षाने सोन्याच्या भावात फक्त वाढ झालेलीच पाहिली आहे. जून महिन्यात सोन्याने ३०,७५० रुपये ही उच्चांकी पातळी गाठली होती. पण नंतर काही कारणामूळे सोन्याचे भाव २९ हजारांपर्यंत घसरले होते. परंतु गेल्या दोन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या भावाला तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे. भारतीय तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचे झालेले अवमूल्यन हे प्रमुख कारण आहे. डॉलरचे कायम वाढणारे दर आणि त्याच्या तुलनेत रुपयाची होणारी घट सोन्याच्या भावावर प्रत्यक्षपणे परिणाम करत असल्याचेही म्हटले आहे.
Source : Marathi News.