सर्व प्रथम पूजेचा मान प्राप्त केलेला मनमोहक ”श्री गणेशा ”
अश्या या गणेशा चे परशु हे तर्क, अंकुश म्हणजे नीती व मोदक हे वेदांत म्हणुन मानल्या जाते, निर्मळ विचार म्हणजे श्री गणेशाची सोंड तर दाताचा पूर्ण सुळा हे श्रद्धेचे व अर्धा सुळां हे बुद्धीचे प्रतिक मानले जाते, या ओंकार स्वरूपाच्या विघ्नहर्त्याला कोटी कोटी वंदन करू या ! ….
बुद्धीची, विद्येची, कलेची देवता असणारे हे दैवत प्रत्येक मानवाला सारखच जवळचा वाटावं हिमोठी विलक्षण गोष्ट आहे, लोक कलांना, तसेच शिल्पकार, मूर्तिकार यांना विलक्षण आकर्षण आहेच, व सामान्य मानवाला या दैवता विषयी वाटणारी आपुलकी विलोभनिय आहे. मोठमोठी महान व्यक्ती उत्सवाचे किती तरी महत्व सांगून गेलेत.उत्सव हे ऐक्याचे, प्रेमाचे प्रसंनतेचे, धर्माचे आणि भावनेचे संवर्धक आहे. संस्कृतीचे दोन घटक असतात, प्रेम आणि श्रेय आपल्याला रुचणारा लौकिक असा म्हणजे प्रेम होय. संस्कृतीमधील सात्विक संकल्पना म्हणजे श्रेय होय. आज गणेश उत्सवात जे घडते ते सगळे प्रेम आहे.सृजन, सजावट, नाच, मिरवणूक हे सर्व प्रेमच, उत्सव हे मुळी प्रेम भावना तर प्रेम हे शरीर मानले मग प्रबोधन हा त्याचा आत्मा म्हणावा लागेल. स्वातंत्र्य पूर्व काळात लोकशाहीच्या प्रबोधनासाठी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु झाला आपण स्वतंत्र झाल्यावर प्रबोधनाची गरज हि संपलेली दिसत नाही. भ्रष्टाच्यार, हुंडाबळी. भृणहत्या, आतंकवाद, बलात्कार, ऱ्यगिंन, अश्या कितीतरी विषयांवर समाजाला प्रबोधनाची गरज आहे. हे प्रबोधन आज उत्सवाद्वारे होणे गरजेचे आहे. श्री गजाननाचे श्रेय स्वरूप समजून घ्यावयाचे असेल तर ज्ञांनेश्वरीतून समजावे लागेल त्यात म्हटले आहे कि श्री गणेशाचा प्रवास ओंकार स्वरूपा पासून शिव सुता पर्यंत झाला आहे, शिवसुत झालेला गणपती प्रत्यक्ष गणात नाचलेला आहे, ज्ञांनेंश्वर माउलींनी वैदीक गणपतीला श्रध्येचा पहिला अंकुर आदिबीज म्हणून संबोधले आहे, तर समर्थांनी त्याला निर्गुणांचा मुळारंभ म्हटलेले आहे. ज्ञांनेंश्वरीत चार वेद हे गणपतीचे शरीर मानले जाते. म्हणून त्याना वेदमूर्ती, अठरा पुराणे हे गणपतीचे अलंकार होत, ज्ञानसाधक तत्व हे गणपतीच्या मौक्तिकमाळां आहे, छन्दोबद्ध रचना हे कोंदण असून शब्द रचनेचा अलंकार हे गणपतीचे परिधान केलेल्या वस्त्रांचासुंदर असा पोत आहे, तसेच बुद्धीला गणपतीच्या कमरेचा शेला म्हटलेले आहे, साहित्यातील निर्दोषता या वस्त्राच्या दशा मानलेल्या आहे.असा हा रूपकात्मक गणेश मनी मुरवला तरच खरे ”तत्वदर्शन” होय.तत्वज्ञांनाची आद्य्ता , प्राचीनता ज्याला कळली त्यालाच गणपती समजला असे म्हणता येईल आणि त्याच दृष्टीने उत्सवाचे रूपक समजून घेणे महत्वाचे आहे. ज्ञांनेश्वर माउलीने गणेशाचे उल्लेखनीय असे वर्णन म्हणजे त्याचे सहा हात हे षटदर्शन होय, या प्रत्येक हातात साधनस्वरूप एक एक आयुध हि आहेत.
वरकर्मी श्री गणेशाचे चित्र कितीही वेगळे दिसत असले तरी श्रद्धा विरहीत बुद्धीपेक्षा बुद्धी विरहीत श्रद्धाच मानवाला मोक्षंप्रताला नेते हे समजून येते.हे सर्व वर्णन रूपकात्मक गणेशाचेच आहे, गणेशाची मूर्ती व त्याचे भौतिक रूप अथर्व वेदात सांगितले आहे, गणेशाला ब्रम्ह स्वरूप देण्याचे काम पुराणांनी केलेले आहे. गजाननाच्या प्रत्येक रुपास ओंकार स्वरूप मानलेले आहे. सृष्टी निर्मितीचे निमित्त म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांच्यात ब्रम्ह व माया,देव आणि दिव्य म्हटले जाते. ओंकाराचे प्रथम अक्षर म्हणजे प्रकृती त्यातील, उ म्हणजे उदर मानले जाते.हे उदर ईतके विशाल आहे कि त्यात विश्वाचा एवढा मोठा पसारा सामावण्याची शक्तीआहे.त्यावर मकार हे मस्तक स्थित आहे. मस्तकाचे विशेष म्हणजे बारीक नेत्र सूक्ष्म अवलोकनाचे प्रतिक आहे. जगत व्यापा कडे श्रीगणेशाचे अति सूक्ष्म असे बारकाईने लक्ष आहे असा अर्थ होतो. सुपासारखे कान हे श्रवण शक्तीचे वैशिष्ठ दाखवितात. कानावर कितीही गोष्टी येत असल्या तरी सुपातून पाखडून हवे तेच अंतकरणात घेणारे सुपासारखे कान असा हा तत्वरूप, ज्ञांनरूप गणेश चौदा विद्या, चौसष्ट कलाधारक, म्हणूनच रंग् देवता या स्वरूपात स्वीकारल्या गेलेला, लोक कलांनी या गणेशाला रंग मंचावर आणले.रंग मंचावर नाचणारा लोकनाट्यातील गणपती लोकांना अधिक जवळचा वाटतो, गणा शिवाय लोकनाट्य होतच नाही हि वास्तू स्थिती आहे. या रंगदेवतेचा लोकमान्य टिळकांनी कलात्मक आणि जाणीवपूर्वक उपयोग करून गणपतीचा सार्वजनिक उत्सव सुरु केला.जन संघटना होण्यासाठी लोकमानसात रुजलेल्या एखाद्या संकल्पनेचीच गरज होती,हे जाणून शाहिरी आणि लोकनाट्यातून आधीच आलेल्या गणपतीची निवड त्यांनी केली, ईतर देवतेपेक्षा विद्येची आणि कलेची देवता म्हणून तिचा सार्वजनिक उत्सव लोकमासानकडून विनाविलंब स्वीकारला गेला. उत्सवाचे महत्व जाणल्या गेल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपला हेतू उद्देश तपासूनच उत्सवाचा आत्मा म्हणजे प्रबोधन पुन्हा जागे व्हायला हवे, म्हणून आज आणि पुढे हि गणेश उत्सव साजरा करताना मनातील भावना शुद्ध स्वरूपाच्या व जागरूक ठेवणे आवश्यक आहे,त्यातून मनोरंजन व उत्सव या दोहोचा मेळ अध्यात्मिक
स्वरूपाचा व्हायला हवा.Source : Marathi Unlimited.