साखरेच्या भावात महिनाभरात किलोमागे तब्बल आठ रूपयांनी वाढ झाली असून, साखरेचे दर ४0 रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे आता कटींग चहासह सर्वच गोड पदार्थांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेली मागणी, केंद्राने दिलेला कमी कोटा व पावसाअभावी ऊसाला बसलेला फटका यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे. आठवडाभरातच क्विंटलमागे तीनशे रुपये भाववाढ झाली असून, घाऊक बाजारात साखरेचा भाव प्रतिक्विंटल ३,७00 रुपयांवर गेला.
Source : Marathi news Updates.