उद्धव ठाकरेंनी केलं राजच्या मोर्चाचं कौतुक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समेटाच्या चर्चेला जोर चढला असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा राज यांच्या मंगळवारच्या मोर्चाचं कौतुक केलंय. त्यामुळं ठाकरे बंधुंचे संबंध संघर्षाकडून समेटाकडे जात असल्याचेच स्पष्ट संकेत दिसत आहेत. राज ठाकरेंच्या आझाद मैदापर्यंत काढलेल्या मोर्चापूर्वीदेखील उद्धव ठाकरेंनी हिदुत्वाचा मुद्दा पुढं करत खुल्या दिलाने राज ठाकरेंचे समर्थन केले होते. एवढंच नव्हे, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्य़ा मोर्चाच्या बातमीला शिवसेनेचं मुखपत्र सामनानं ठळक प्रसिद्धी दिली होती. राज ठाकरेंची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापली. शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राज ठाकरेंबाबतच्या बातम्यांना ‘सामना’त प्रसिद्धी मिळत नव्हती.
Source : Marathi News Updates