तापाने आजारी असलेले राज ठाकरे दोन आठवड्यांनी घराबाहेर पडले ते आपल्या नव्या लूकसह… कधीच दाढी न ठेवणाऱ्या राज ठाकरे यांनी फ्रेंच कट दाढी ठेवली होती. ही राज यांची नवी स्टाईल त्यांचे काका बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मिळतीजुळती.. त्यामुळे राज यांच्या या नव्या लूकची चर्चा आता सुरू झाली आहे. छोट्याशा आजारपणानंतर मुख्यमंत्र्यांना भेटायला बाहेर पडलेले राज ठाकरे दिसले ते या नव्या रुपात… त्यांना या रुपात बघून अनेकांना त्यांच्या काकांची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही…
Source : Marathi News