देशाच्या ६६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण करण्याची मनमोहन सिंग यांची ही नववी वेळ आहे. ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, देशावर वैश्विक मंदीचा आणि नैसर्गिक आपत्तीचा परिणाम होत आहे. असे असले तरी भारत यातून नक्की मार्ग काढेल.
जागतिक अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, वैश्विक मंदीचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होत आहे. तसेच सध्या समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे देशाच्या अडचणींमध्ये भरच पडली आहे. मात्र असे असले तरी चिंतेचे कारण नाही, देशात अन्न-धान्याचा मुबलक साठा आहे. तसेच यावर्षी दरडोई उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले
Source : Marathi News.