अमेरिकेतल्या गुरुद्वारात गोळीबार, ७ ठार
न्यूयॉर्क, दि. ६ काही अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारात सात जण ठार झाले. त्यात एका हल्लेखोराचाही समावेश आहे. रविवारच्या प्रार्थनेसाठी भाविक गुरुद्वारात जमले असताना, हा गोळाबार करण्यात आला. गोळीबारात २०हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गोळीबारात चार जण गुरुद्वाराच्या आत तर तिघे गुरुद्वाराच्या बाहेर मारले गेले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी एका हल्लेखोराला टिपले. या हल्लेखोराव्यतिरिक्त अन्य कोणी हल्लेखोर आहे की नाही, याची अद्याप खातरजमा झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Source : Marathi Unlimited News