दारिद्रय़रेषेखालील लोकांना मोबाइल हँडसेट आणि मोफत टॉकटाइम देण्याचा विचार सरकारी पातळीवर गांभीर्याने सुरू असून, याची घोषणा येत्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान स्वत: याची घोषणा करतील. सुमारे अडीच लाख पंचायतींना इंटरनेटद्वारे जोडण्याची योजना यशस्वी झाल्यानंतर तंत्रज्ञान क्रांतीचे पुढचे पाऊल मोबाइल उपक्रमातून टाकण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हर हाथ में फोन’ असे या योजनेचे नाव आहे. यामुळे माहितीचे आदानप्रदान तर मोठय़ा प्रमाणावर वाढेलच; पण या माध्यमातून सरकार वेळोवेळी घेत असलेले जनहिताचे निर्णयही प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे.
Source : Marathi News.