विनाश करू नका…

Like Like Love Haha Wow Sad Angry 2 Do Not Destroy, Swami Vivekananda’s works In the second place, the idea...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Do Not Destroy, Swami Vivekananda’s works In the second place, the idea of a creator God does not explain the anomaly, but simply expresses the cruel Rat.

swami vivekanad suviachrविनाश करू नका: या तत्वावर निष्ठा ठेवा, मूर्ती भंजक सुधारक जगाचे काही चांगले करू शकत नाही. कोणतीही वस्तू फोडू नका, तिचा नाश करू नका. बरे तर नवीन काही उभारा. तुम्हाला शक्य असेल तेवढी मदत करा. जे काही घडत आहे ते घडू द्या. तुम्हाला दुसर्याला मदत करता येत नसली तरी निदान दुसर्याचे अनिष्ट करू नका, दुसर्याला वर नेण्यासाठी मदत करा. श्रमिक वर्गाला मान द्या, त्यांचे कौतुक करा व धर्य वाढवा. आपण आपल्या पूर्वजांनी कुठे तत्व ज्ञानाची दोन ग्रन्थे का लिहिली असतील किंवा मन्दिरे का बांधली असतील तर किती कौतुक व गवगवा करतो! पण ज्यांनी आपल्या हृदयातील रक्ताचे सिंचन करून जगाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या व जगात घडलेल्या सगळ्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला त्यांची स्तुती कोण करणार? मोठ्मोठ्याना मानवंदना मिळते,पण कठीण परिस्थितीतही राहून जे न करकुरता,अनंत प्रेमाने सहनशीलता ठेवून रात्रं दिवस निर्भयपणे कार्यशीलता ज्या गरीब वर्गात आजही गढलेले आहेत. त्यांच्या कार्यात का वीरता नाही? त्यांची कोणी वीरता गात नसतानाही जे लहान सहान कामेहि तितक्याच नि:स्वार्थपनानेआणि कर्तव्य बुद्धीने करतात. तेच खरोखर धन्य होत. त्यांनाच वंदन करायला हवे.  सर्व समान्य जनतेची उपेक्षा हे आम्ही घोर राष्ट्रीय पाप समजतो आपल्या अवनतीचे ते एक कारण आहे. भारतातील सर्व सामान्य जनतेला पुन्हा जोपर्यंत चांगले शिक्षण प्राप्त होत नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची व अन्य गोष्ठींची जोपर्यंत नित काळजी घेतली जात नाही तोपर्यंत आपण कितीही राजकारण केले तरी त्यापासून काहीही लाभ होणार नाही. आपल्याला जर भारताचे पुनरउत्थापण करायचे असेल तर आपण त्यांच्या साठी कामे केली पाहिजेत. वेळे पुरता त्यांची फसगत करून चालणार नाही.

आपले कार्य निराधार, गरीब, अशिक्षित शेतकरी, कामकरी वर्गासाठी आहे आणि प्रथम त्याच्या साठी काम केल्या नंतर जर काही वेळ उरला तर सुशीक्षितान साठी करायला पाहिजेत.

धर्माला दोष देऊ नका:  भारतातील सामान्य गरीब जनतेला, पतीतांना, सहाय्यक नाही असे समजून त्यांच्या अज्ञांनतेचा फायदा उचलून त्याना खालचे खालीच ठेवण्यात येत आहे.गेल्या काही वर्षात देशातील विचारी व्यक्तिंना समाजाच्या या दुरव्यवस्थेची जाणीव झालेली आहे, परंतु दुर्दैवाने त्यांनी या परिस्थिती संबंधीचा सारा दोष हिंदू धर्माच्या माथी मारलेला आहे. समाजाच्या उन्नतीचा एकमात्र उपाय म्हणजे जगातील या सर्व श्रेष्ठ धर्माचा नाश करून टाकणे हाच होय असे त्यांना वाटते, पण माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू कृपेने मला हे रहस्य कळलेले आहे ते म्हणजे, हिंदू धर्माचा यात काहीही दोष नाही. उलट हिंदू धर्म तर सर्वांना शिकवितो कि विश्वातील सर्व प्राणी तुमच्याच आत्म्याची भिन्न भिन्न रूपे होत हे सत्य आपण प्रत्येक्ष कार्यात उतरविलेले नाही, म्हणूनच तर आज आपल्या समाजाची हि दयनीय अशी हीन दशा झाली आहे. समाजाची हि शोचनिय अवस्था आपण दुर केली पाहिजे, पण धर्म नष्ट करून नव्हे तर हिंदू धर्माच्या उदात्त, महान अश्या शिकवणुकीचे अनुसरण करुन आणि हिंदू धर्माची स्वाभाविक परी अश्या बौध धर्माच्या प्रगाढ सहृदयतेची त्या शिकवनुकिंना जोड देऊन. आधुनिक समाज सुधारकांना भारतातील धर्म प्रथम नष्ट केल्या वाचून सुधारणा  घडवून आणण्याचा अन्य उपाय दिसला नाही. फारच थोड्याजणांनी स्वत:च्या धर्माचा सांगोपांग अभ्यास केला.आणि त्यांच्या  पैकी एकाने देखील सर्व धर्माची जननी असलेल्या या आपल्या धर्माचे मर्म जाणण्यासाठी जी आवश्यकता आहे ती केलीनाही. ईश्वर ईच्छेने मी हि समश्या सोडविली आहे असे मी ठाम पणे म्हणू शकतो. हिंदू समाजाच्या उन्नती साठी धर्म नष्ट करून टाकण्याची जरुरत नाही. समाजाची सध्या जी अवस्था आहे. ती धर्मा मूळे नव्हे तर सामाजिक व्यवहाराच्या बाबतीत ज्या तर्हेने धर्माचा उपयोग करायला हवा होता तसा तो केला नाही. म्हणूनच आज समाजाची अशी दशा झालेली आहे. आपल्या प्राचीन शास्त्र ग्र्न्थाचा आधार घेऊन मी हि गोष्ट समप्रमाणात सिद्ध करण्यास तयार आहे, तिचीच हि शिकवण आहे, त्याची प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भूतकाळाच्या पायावरच भविष्याची उभारणी होत असते. भूतकाळातील ज्ञानाच्या शाश्वत झर्याचे जल आकंठ प्राशन करा. आणि मग समोर पहा; प्रगती पथावर पुढे पुढे चला व भारताला पूर्वी पेक्षाही  अधिक तेजस्वी,अधिक थोर व अधिक उन्नत बनवा.आपले पूर्वज थोर होते याची जाणीव असू द्या.आपल्या जीवनाचे आधारभूत घटक समजून घ्यायला पाहिजे. आपल्या शिरांमधून कोणते रक्त वाहात आहे हे हि जाणून घेतले पाहिजे. श्रद्धा व प्राचीन म्ह्त्तेची जाणीव यांच्या बळावर आपण पूर्वी पेक्षाही अधिक थोर अश्या भारताची उभारणी केली पाहिजे.  कोणाचे म्हणणे असेही आहेत कि भूतकाळाकडे अधिक पहिल्या मूळेच भारताची सगळी दु;खे निर्माण झाली. पण हे सत्य नव्हे. या उलट आहे. म्हणून म्हणतो कि हिंदू लोक आपल्या भूत काळाचा जितका अधिक अभ्यास करतील तितकेच त्यांचे भावी जीवन अधिक उज्वल होईल, आणि हा भूतकाळ जो कोणी प्रत्येकाच्या दाराशी आणून उभा करील तो देशाचा फार मोठा हितकर्ता आहे असे म्हणावे लागेल. प्राचीन काळाचे नियम रीतीभाती वाईट होत्या म्हणून भारताचे अध:पतन झाले असे नाही, तर त्या नियमांची व रीतीभातींची जी न्यायसंगत परिणीती व्हायला हवी होती ती होऊ न दिल्यामूळे भारताचे अध:पतन झालेले आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Related Stories