भाजपा पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ‘ब्लॉग बॉम्ब’ टाकला आहे. २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा भाजपाला बहुमत मिळणार नसल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वतरुळात एकच खळबळ उडाली आहे.
पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर एकीकडे संघ आणि भाजपाने खल सुरू केला आहे, तर दुसरीकडे रालोआचा घटक पक्ष जदयूचे नेते आणि बिहाराचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मोदींच्या नावाला विरोध आहे. अशा वेळी अडवाणी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही आघाडीचे सरकार आले तरी, पंतप्रधान मात्र काँग्रेस किंवा भाजपाचा बनण्याची शक्यता नसल्याचे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या २५ वर्षांत देशातील राष्ट्रीय राजकारणाला जे स्वरूप प्राप्त झाले आहे, त्यानुसार केंद्रात भाजपा किंवा काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनवणे अशक्य आहे. त्यामुळे तिसरी आघाडीच्या सरकारची शक्यता नाही, असेही ते म्हणाले.
Source : Online Team