उपयुक्त कडूनिंब.
उन्हाळ्याच्या दिवसां मध्ये कडूनिंबाच्या पानाचा उपयोग सौंदर्य वर्धनासाठी केल्यास गुणकारी ठरतो. कडू निंबाची पाने गारवा देत असल्याने त्यांचा वापर उन्हाळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. कडुनिंबाची पाने, बादाम, साय आणि मध यांची मिक्सर मध्ये फिरवून पेस्ट करून घ्यावी. आंघोळ करण्या आधी या पेस्टचा बॉडी प्यक अंगाला लावल्यास त्वचा तजेलदार होते. कडू निंबाची पाने पाण्यात उकळवून त्यात गुलाबपाणी मिसळावे. या पाण्यात चेहरा धुतल्यास अति उत्साहवर्धक वाटते. चेहऱ्याची त्वचा तजेलदार दिसण्यासाठी लिंबाचा रस व कडू निंबाच्या पानाचा रस एकत्र करून चेहऱ्यास लावावा. कडुनिंबाच्या पानांच्या रसात मध एकत्र करून चेहर्याला त्याच प्रमाणे सर्वांगाला लावावा. चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यासाठी कडूनिंबाची पाने व दही यांची पेस्ट लावावी. तेलकट त्वचेच्या समस्या उन्हाळ्यात जास्त वाढतात त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी कडूनिंबाच्या पानाचा रस टोम्यटोचा रस आणि चण्याच्या डाळीचे पीठ एकत्र करून त्याची पेस्ट चेहरयास ३० मिनिटपर्यंत लावावी नंतर कोमट पाण्याने चेह्ला स्वच्छ घुवून घ्यावा. चेहऱ्यावरील ताजेपणा निख्रून येतो. या पानांची पेस्ट करून चेहऱ्यावर दररोज दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवल्यास पिंपल्स मिटण्यास फायदा होतो. तसेच याचा रस दररोज एक चमचा सेवन केल्यास त्वचा रोगावर याचा फायदा होतो, आरोग्य चांगले राहते. सकाळी तोंड धुतल्या नंतर कडू निंबाची कोवळी पाने चावून खावी त्याने दातातील किटाणू नाहीसे होवून मुख शुद्धी होते, पोटातील विकार दूर होतात.कडूनिंबाचे झाड आपल्या अंगणात असल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते. हा पाला शक्यतोवर पावसाळ्यात लोखंडी घमेंलात किंवा बादलीत ठेवून घरात जाळून याचा धूर करावा म्हणजे घरातील मच्छर किंवा जीवाणु नष्ट होतात. इतका हा कडूनिंब गुणकारी व फायदेशीर आहे.
Source : Marathi Unlimited.