दुष्काळ, मंत्रालय आग, आदर्श गाजणार!
आजपासून विधीमनडळात पावसाळी अधिवेशन
सरकारला कोंडीत पकडण्यास विरोधक सज्ज !
सरकारला जरी विविध समस्यांनी घेरले असले तरी, विरोधक आपल्या कोठारातील दारुगोळा कित्ती समक्षपणे वापरून सरकारला जेरीला आणतात, हा एक प्रश्नच आहे, साधारण पाने आठवड्याचे यंदाही पावसाळी अधिवेशन अनेक कारणांनी गाजण्याची शक्यता आहे. मंत्रालयाला लागलेली आग, ती लवकर आटोक्यात आणण्यात प्रशाषणाला आलेले अपयश. त्यामुळे आगीच्या भाक्ष्याथानी पडलेल्या मंत्रालयातल्या अनेक महत्वाच्या विभागांच्या फायली, तसेच ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ सारख्या महागड्या ठिकाणी सरकारने अवाढव्य पैसा मोजून घेतलेली कार्यालये, शेतकरी आत्महत्येचे प्रकरण, तोल नाक्याची वसुली हे विरोधकांचे ऐरणीवर आहेत.
हे सर्व लक्षात घेता या वर्षीचे पावसाळी अधिवेशन हे चांगलेच गाजणार हे मात्र निश्चित. आदर्श घोटाळ्य प्रकरणी अशोक चौहान यांच्यावर आरोपपत्र दाखल करून आयते कोलीतच दिले, हि चौकशी सीबीआय कक्षेत येत नसल्याचे राज्य सरकारच्या भूमिकेमुळे विरोधक सत्ताधरयांना घेरण्याची शक्यता आहे.
Source : Marathi Unlimited.