ज्योतिर्मयुख आवृत्ती ज्योतिषविषयक….
बाळाला पाळण्यात घालण्यास योग्य दिवस पाळणे !
पाळण्यात घालण्यास मुलाला बारावा दिवस व मुलीला तेरावा दिवस प्रशस्त मनीला आहे, ह्या दिवशी अडचण असल्यास किंवा अमावस्यादि असल्यास विशेष कुयोग असतील तर सोळावा, अठरावा, बाविसावा किंवा बत्तीसावा हे दिवस व मृग, चित्रा, अनुराधा, रेवती, पुनर्वसू, पुष्य, अश्विनी, हस्त, रोहिणी आणि तिन्ही उत्तरा हि नक्षत्रे सांगितलेली आहेत. तसेच सूर्य नक्षत्रा पासून पहिली पाच आणि शेवटची सात नक्षत्रे शुभ हेत, व बाकी राहिलेली पंधरा नक्षत्रे डोळा रोह्नास व्रज करावी.असे कित्येक ग्रंथकरांचे म्हणणे आहे.पूर्वे कडे मस्तक करून शिशूस प्रथम पाळण्यात घालावे.
*अब्द्पुर्ती [ वाढ दिवस ]
ज्या दिवशी जन्म झाला असेल तो दिवस पुन्हा दुसर्या वर्षी आला म्हणजे त्याला वाढ दिवस म्हणतात.दरवर्षी जन्म तिथीचे दिवशी वाढ दिवस करावा. एक वर्ष पर्यंत प्रतीमासीं करावा.काळा नुसार हा प्रतीमासी वाढ दिवस खूप धूमधामित म्हणजे अति खर्च करून करणे जरुरीचे नाही.पण शास्त्रानुसार ग्रंथकार सांगतात कि एकवर्ष पर्यंतच प्रतिमासी करावा .
ती सोपी पद्धत आहे, जन्म तिथीचा दोन दिवस योग येत असेल तर जी तिथी सूर्योदयाला असून सहा घटीकांहून अधिक असेल ती घ्यावी.असा योग नसेल तर प्रथम दिवसाची तिथी घ्यावी व्यवहारात आता लहान मुलांच्या बरोबरीत मोठ्यान चाही वाढ दिवस करण्याची प्रथा आहे. पण शकतो लहान मुलां साठी वाढ दिवसाचे दिवशी अंगाला सुवाषिक तेल लावून उष्णोदकाने मंगल स्नान करावे, धर्मसिंधू असे सांगितले आहे कि वाढदिवसाचे दिवशी स्नान झाल्यानंतर एक लहानश्या तंदुल राशीवरसुपारी ठेवून ती मार्कंडेयऋषीरुपी देवता आहे. असे कल्पून प्रथम कुलदेवतेचे व तसेच अश्वत्थांमा, बली, व्यासं, हनुमान, बिभीषण, परशुराम ईत्यादी चिरंजीवांचे स्मरण करून नंतर मार्कंडेय ऋषीची पूजा करावी, आणि पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
मंत्र :-
मार्कंडेय नमस्ते$स्तु सप्त कल्पांतजीवन | आयुरारोग्यसिद्धर्थ प्रसीद भगवन्मुने ||
चिरंजीवी यथा त्वं तुं मुनीनां प्रवर द्विज | कुरुष्व मुनी शार्दुल तथा मां चिरंजिविनम ||
असे: वाढ दिवसाचे दिवशी श्मश्रु, कलह, मास भक्षण वै. करू नयेत. हे सर्व एकदम लहान मुले करू शकत नसेल तर आई ने अथवा भावाने करावेत, किंवा वडीला नि करता येते. मात्र हे सर्व विधी झाल्या नंतरच ज्याचे वाढदिवस असेल त्याचे औक्षण करावे,त्याला गोड खाऊ द्यावा.
Source : Marathi Unlimited.