hanuman-ani-bhaktpralhad. bhakt pralhad shri hanuman bhakt, hanuman bhakt, indian food recipes marathi news sites, news, shri hanuman bhakt bhktapralhad, social updates,
*हनुमाना जवळ शक्ती सामर्थ्य, भक्ती सामर्थ्य, युक्ती सामर्थ्य, बुद्धी सामर्थ्य, सिद्धी सामर्थ्य आणि सेवा सामर्थ्य अशी सामर्थ्य होती. तशीच ती समर्थ रामदासांच्या ठिकाणी हि होती. समर्थ रामदास स्वामींना हनुमानाचा अवतार समजतात. समर्थ स्वत:ला हनुमाना प्रमाणेच ”रामाचा दास” म्हणून घेत व तसे म्हणून घेण्यात भूषण मानीत असत. रामभ्क्तीविना हनुमानाच्या चरीत्त्राची जशी कल्पनाच करता येत नाही, तशीच समर्थ रामदासांच्या चरित्राची कल्पना राम भक्ती शिवाय करता येणार नाही. राम हे समर्थांचे कुलदैवत होते. समर्थ रामदास हि मनाने सतत प्रभूरामचंद्रांच्या चरणी भक्तीने लीन झालेले होते. प्रभूरामचंद्र यांनी त्यांना अनेकदा दर्शन दिले आहे असा समज आहे. हनुमानाला सूर्याच्या वरदानाने सर्व शाश्त्रांचे ज्ञान प्राप्त झाले होते, रामदासांचे वडील सूर्याजीपंत, यांना प्राप्त झालेल्या सूर्य वरदानानेच रामदासांच्या ठिकाणी अलौकिक ग्रहणशक्ती आणि एकपाठीपण आला. व त्यामुळे त्यांना सर्व शास्त्राचे ज्ञान अवगत करता आले.
रामदास टाकळी येथे पुरश्चरण ”श्री राम जयराम जय जयराम” या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप व तपश्चर्या करीत असताना रोज एक माकड तेथे येऊन बसायचे, रामदासांचा तेरा कोटीचा जप पूर्ण झाला ते घ्यानस्त बसले असता ते माकड त्यांच्या समोर बसले. त्या माकडातील हनुमानाने रामदासाच्या शरीरात प्रवेश केला, रामदासांनी डोळे उघडले तेव्हात्या माकडाने म्हणजेच हनुमानाने आपले प्रचंड भीमरूप रामदासांना दाखविले, व प्रेमभराने त्यांना आलिंगन दिले. आणि त्यांना कृष्णतीरी जाऊन जग उद्धार करण्याचा प्रभुराम चंद्रांचा आदेश सांगितला रामदास आणि मारुती यांच्यात एवढे जिव्हाळ्याचे साहचर्य होते, रामराज्याच्या प्रतिष्टाप्नेला हातभार लावणे हे हनुमानाचे एक कार्य होते, तसेच शिवाजी महाराज स्थापन करू पहात असलेल्या हिंदवी स्वराज्याचे राम राज्य बनविण्यास हातभार लावण्याचे कार्य समर्थांनी चालविले होते. समर्थांच्या ठिकाणी असलेला मारुती भक्तीचा, हनुमंताशी असलेल्या त्यांच्या सायुज्य तेचा परिपाक म्हणजे त्यांच्या हातून झालेली मारुती मूर्तीची स्थापना होय. या मूर्ती शिंगणवाडी, माजगाव, उंब्रज, शहापूर, मनपाडले, मसूर, पाटगाव, बहेचापळ, शिराळे व चापळ ई. होत.
Source : Marathi Unlimited .