नागपूर : रक्त पेढीतून मिळणारे रक्ताचे दर वाढणार असल्याने महागायीमुळे राज्यात गरीब तथात सर्व सामन्यांचे पेटलेले रक्त गोठण्याची पाली आली आहे. प्रती युनिट ५० टक्के दरवाढ करण्याची शिफारस महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदने केलेला हा धक्कादाय निर्णय आहे. या दरवाढीने सर्वसामन्याचे रक्त नक्कीच खालवाडणार आहे. ‘रक्त दान हे जीवनदान’ असे म्हटले जात, किबहुंना आहेच. जीवनातील संकटांशी झुंजणाऱ्या रुग्णांना ऐनवेळी रक्त न मिळाल्यास प्रसंगी जीव जातो. रुग्णाला वेळीच रक्त दिल्यास मृत्यूचा दारातून त्याला परत काढला जातो. सध्या महागायीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, त्यात हि नवी भर. गरिबांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही तर आता रक्त सुद्धा कुठून मुलणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Source : Nagpur Updates.