बालपणाला लागलेले ग्रहण..
Like
Like Love Haha Wow Sad Angry

बालपणाला लागलेले ग्रहण,  एक अतितीव्र समस्या!

ata balpan harawaleyहल्ली एकूणच मुलांच्या बाबतीत थोड्या फार फरकाने असे दिसून येते कि कॉलेज मध्ये पाय ठेवल्या नंतरच मुले स्वत:ला मोठी समजू लागत, पण आता हा काळही मागे पडलाय, आता मुलांच्या बालपणाचा जणू संकोच झाला आहे. आणि मुले फार लवकर ”मोठी” होत आहेत.  आई-वडील स्वत:च समजू शकत नाही कि आपला सायकल, गाडी खेळणारा मुलगा मोठा कधी झाला? हल्ली सर्वच मुलांचा ”मोठ” होण्याचा कालावधी कमी होण्याला मानसोपचारतज्ञ ‘ऐज कम्प्रेशन’ म्हणजे ‘वयाचा संकोच’ हि तज्ञां देतात. याचा सरळ अर्थ म्हणजे मुलांचे परिपक्व होण्याचे वय घटत चालले आहे. आणि विशेष म्हणजे हि प्रक्रीया केवळ ”मेट्रोसिटीज” पुरता नसून छोट्या गावांमधून सारख्याच प्रमाणात बघायला मिळते.

पूर्वीच्या काळी मुलीने साडी व मुलाने पहिल्यांदा दाढी केली कि ती मोठी झाली असे समजल्या जात असे, पण आता या कृतींची वाट बघण्यात काही अर्थ नाही .कारण जग खूप बदललेले आहे. एक एक पायरी चढण्याचा संयम आजच्या पिढी मध्ये दिसून येत नाही. या मुलांना खेळण्याच्या जागी मोबाईल व गाडी पहायची असते. त्यांच्या मित्र परिवारात गर्लफ्रेंड व बॉयफ्रेंड बघायला पाहिजे. हि त्यांची सीमारेषाच म्हणावी लागेल. हि मुल मॉडेल प्रमाणे दिसणे व राहणे पसंत करतात. आणि योग्य वेळे आधीच बर्याच गोष्टीबघून एकूण त्यावर विश्वास करून समजून घेतात ईतकच नाही तर त्यावर चर्चा देखील करताना दिसतात. त्यांच्या दृष्टीने, मोठ किंवा म्य्चुअर होणे म्हणजे ‘सेक्स’, ‘हिंसा’ यां सारख्या मोठ्यांच्या विषया बद्दलची माहिती होणं होय.

हा बदल मुलां मधील फक्त मानसिक पातळी वरच आहे असे नाही तर त्यांचा शारीरिक विकासही वेगाने होत असलेला दिसून येत आहे. याबाबत देश विदेशात बरेचसंयुक्त संशोधन सुरु आहे. अमेरिका आणि ब्रिटन मध्ये संशोधनात आठ वर्षातच मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे लक्षण आढळलित. पूर्वी हे प्रमाण शंभरात एक अस होत.हे विशेषज्ञ मान्य करतात. फार पूर्वी १५ते २०… त्या नंतर १३ ते १५ व नंतर ८ ते १२ असे आहे. या मागील प्रमुख कारण म्हणजे. आहारात झालेला विलक्षण बदल फास्टफूड सारख्या पदार्थांचा आहाराचा वापर, प्रदूषित वातावरण, खाद्य पदार्थान मध्ये उपस्तीत असलेले कीटक नाश्कातले घटक, हे हार्मोन्सचे प्रमाण वाढवते. खास करून ईस्ट्रोजन नावाचे हार्मोन्स अधिक प्रमाणात स्रउ लागते. या हार्मोन्सच्या अधिक स्रवनामुळे मुलीं मध्ये मासिक पाळी लवकर येऊ लागली आहे. याच बदलामुळे मुलांमध्ये शारीरिक बदल दिसू लागले आहे. असे समजते कि प्रदूषित वातावरणामुळेच मुलां मध्ये नपुसक तेची समस्या देखील वाढलेली दिसून येत आहे,विशेषज्ञ सांगतात. २० वर्ष पर्यंत पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या ६ते१२ कोटी ईतकी होत असे,मात्र  आता ती घटून २ते६  कोटी ईतकी दिसून येते. हि शारीरिक बद्लावाची कारणे असली तरी एकूणच या संकोचलेल्या बालवयामागे ईतरही कारण आहेत. आणि ती म्हणजे, ”मिडिया.”.  * मिडीयाने प्रौढांचे जग मुलां समोर खुले केले आहे. २४ तांस चालणार्या वाहिन्यांवर माहितीच्या नावा खाली सर्व काही खुले दर्शन दाखवले जात आहे. पूर्वीच्या काळी काही विशेष गोष्टी वाढत्या वया नुसारच सावकाश समजत असत. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे ‘इंटरनेट’.   माहितीचे महाजाल असलेल्या इंटरनेटचा गैरवापर होत आहे. त्यावर मुले नको त्या माहीत्यांचा शोध घेऊन स्वत:चेच नुकसान करीत आहेत. त्यामुळे  वाईट परिणाम होत आहेत, नेटवर नको ती माहिती मुले मागवतात, व माहित करून घेतात, काही माहित्या समजण्याची त्यांची क्षमता नसल्यामुळे मुले गोंधळतात व भलत्याच विचारानं मध्ये गुरफटतात. अश्या परीस्थितीत पालकांची भूमिका अतिशय महत्वाची ठरते.

घरात अत्याधुनिक वस्तू आणणे गैर नाही. पण त्यावर पालकांचा अंकुश असणे आवश्यक आहे. बर्याच घरात नोकरी निमित्त आई वडील बाहेर जातात. नेमके याच वेळात मुले नेटचा किंवा टी. व्हीं.चा गैर वापर करण्याची शक्यता अधिक असते. म्हणून त्यावेळी मुलं ईतर कुठल्या गोष्टीन मध्ये व्यस्त राहतील. हे पालकांनी बघावं. हल्ली पालक आणि मुलं यांत पुरेसा संवाद दिसून येत नाही. त्यामुळे आपल्याच कोषात असलेले पालक मुलांना पावलापावलावर असणारे धोके समजून सांगू शकत नाही. आजूबाजूच्या किंवा घरातील मोठ्याभावा-बहिणींच्या मुक्त वातावर्नांचा चटकन प्रभाव पडतो. आणि ते देखील त्याच प्रमाणे वागायला शिकतात. शिथिल पारिवारिक मुल्ये मुलांच्या जीवनात महत्वाची भूमिका निभवतात. बर्याचदा मित्र परिवारात महत्वाचे स्थान मिळविण्यासाठी मित्रां मध्ये प्रभावित माहिती मिळविण्या मागे लागतात. आपण मित्र परिवारात मागे पडू नये म्हणूनहि बरीच मुलं नाईलाजान नको त्या चर्चे मध्ये सहभागी होतात. मुली देखील ग्रुपमघील मैत्रिणीन नुसार नको ते कपडे घालू लागतात.त्यामुळे शरीर प्रदर्शनास वाव मिळतो, मुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. या सर्व अवाजवी माहितीमुळे मुलेमुली मद्ये चित्र विचित्र वातावरण तयार होतो. एकंदरीत या बदलावाचा  गांभीर्याने विचार केला तर शरीर संबंध आणि ईतर अयोग्य गोष्टींची वेळे पूर्वीच मिळालेली माहिती मुलां साठी धोकादायक ठरू लागली आहे. एक वाईट. अनुभव त्यांचे पूर्ण भविष्य आणि भविष्यातले नाते संबंध बिघडवू शकतो. मुलांच्या  निरागस बालपणाला ग्रहण लागत आहे, हे आता निश्चित झाले आहे.  तेव्हा हि वेळे पूर्वीच मिळणारी माहिती आपल्या मुलांना समजूतदार बनवण्या ऐवजी त्यांचे बालपण विकृत तर बनवत नाही याकडे पालकांनी गंभीर पणाने  बघण्याची वेळ आता आलेलीच आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
3 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu