फक्त ११000 गर्भपात सरकारमान्य

Like Like Love Haha Wow Sad Angry शासनमान्य गर्भपात केंद्रांमध्ये वर्षभरात झालेले ११ हजारांहून अधिक गर्भपात हे गर्भलिंग निदान होऊ...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

शासनमान्य गर्भपात केंद्रांमध्ये वर्षभरात झालेले ११ हजारांहून अधिक गर्भपात हे गर्भलिंग निदान होऊ शकणार्‍या गर्भावस्थेनंतर म्हणजेच १२ आठवड्यांनंतर झाल्याचे आणखी एक वास्तव पुढे आले आहे.

राज्यात शासनमान्य ४ हजार २९ तर सरकारी ८३९ गर्भपात केंद्रे आहेत. येथे गर्भधारणेनंतर १२ आठवड्यांच्या आत कोणतेही कारण न देता गर्भपात करता येतो. परंतु, १२ आठवड्यांनंतर मात्र फक्त वैद्यकीय कारणावरून डॉक्टरांनी सुचविल्यासच गर्भपात केला जातो. या शासनमान्य केंद्रांवर गेल्या वर्षी (एप्रिल २0११ ते मार्चअखेर) एकूण १ लाख ११ हजार ८१३ गर्भपात झाले; त्यापैकी ११ हजार २0२ गर्भपात १२ आठवड्यांनंतर झाले आहेत.

याशिवाय एप्रिल २00९ ते मार्च २0१0 या काळात ९६ हजार ९९२ गर्भपात झाले. यापैकी १३ हजार ३४0 गर्भपात १२ आठवड्यांनंतरचे होते. एप्रिल २0१0 ते मार्च २0११ या काळात ९५ हजार ३३२ गर्भपात झाले; त्यापैकी ८ हजार ६६४ गर्भपात १२ आठवड्यांनंतरचे होते, असे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Source : Marathi Unlimited Online Team.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories