श्री साईबाबांच्या शिकवणीतील महत्वाचे मुद्दे.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

shri-sai-baba-guru-mantra The reverberations of Sai mantras transformed the atmosphere to that of spiritual relief from was a steadfast devotee of Shri Sai Baba, and served Baba during His lifetime. Release of Hindi Translation of Shri Guru Bhagwata.

अध्यात्मिक.श्री साईबाबांच्या शिकवणीतील महत्वाचे मुद्दे.
जन्म मृत्युच्या रगाड्यातून सुटका होण्या साठी आत्म ज्ञानच करून घ्यायला पाहिजे, त्यासाठी निरीछ होवून परमेश्वराचे चिंतन करावे, हृदयस्य आत्म्यावर मन केंद्रित करावे. त्यासाठी  ते निश्चल निर्विकार बनवावे. तर गुरूच्या स्वरूपावर आपले मन केंद्रित करावे. त्यांच्या कडून मोक्ष मार्गाचे ज्ञान उमजून घेतले पाहिजे.
* पूर्व जन्माचा काहीतरी संबंध असल्याशिवाय कोनिहि कोनाला भेटत  नाही, यालाच ऋणानुबंध म्हणतात. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे  हसत मुखाने स्वागत करा. कमीत  कमी प्रेमाने बोला. नम्रतेने, आदराने वागा. भुकेल्याला, गरजूंना अन्नदान करा तहानलेल्याला पाणी द्या. वस्त्र्हीनास वस्त्र द्या, त्यामुळे श्रीहरी प्रसंन्न होईल.कोणाचाही हेवा, द्वेष करू नका.
* अल्ला, मालिक हा जगाचा रक्षण करता आहे.आपण त्याचे बंदे होवून राहा.
*श्रध्दा म्हणजे गुरूंच्या वचनावर असीम विश्वास:आणि सबुरी म्हणजे सर्व गोष्टी धीराने व दमाने करणे.
*या जगात आपण निमित्त मात्र आहोत. आपला सूत्रधार सदगुरु आहे. करते करविते तेच आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवल्याने आपला उधार होईल. परमात्मा {परमेश्वर }सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आहे.येथे कोणीही स्वतंत्र नाही. सर्व प्राणीमात्र परमेश्वराच्या आज्ञां पाळीत असतात.
* या जगातल्या सर्व गोष्टी मी धुनी मधुन काढलेल्या ‘उदी’ सारख्या अथवा राखाडीसारख्या क्षुल्लक आहेत. ज्या भक्तांना मी उदी देतो त्यांनी जगातल्या धन-दौलतिची व सुखाची क्षुद्रता ओळखायला हवी. माझ्या हातून ज्यांना उदी मिळते आणि ज्यांच्या कडून मी पैशाची दक्षिणा गोळा करतो त्यांना आत्मज्ञाना संबंधी विचार करायला.लावणे हाच माझा उद्देश असतो.
*मन हे जातीचेच चंचल आहे. काही कारणांनी   ईनद्रीयांची वळवल झाली, तरी आपले शरीर उतावीळ होऊ देऊ नये. ईन्द्रिया वर विश्वास ठेऊ नये. विषयाची लालसा बाळगू नये. याच प्रमाणे अभ्यास करता करता चित्ताचे चंचलपण हळूहळू नाहीसे होईल. आपण ईनद्रीयांचे स्वाधीन होऊ नये. परंतु ईन्द्र्ये दाबुनही ठेवता येत नाही. म्हणून प्रसंगा नुसार विधीपूर्वक त्यांचे नियमन करावे.
*अतिथी म्हणजे साडेतीन हाताचा मानवच असला पाहिजे असे आहे काय?  अतिथीची व्याख्या एवढी संकुचित नाही. ज्याचे अंत:करण भुकेने व्याकूळ झाले आहे, असा जो कोणी जीव ज्या ज्या वेळी येईल तो अतिथी; मग तो माणूस असो वा किडा मुंगी वा प्राणी असो.
* मृत्यू हा माणसाचा खरा मित्र आहे. दोघांचा प्रवास बरोबर चालू असतो, एक दिवस मृत्यू माणसाला नेतो आणि ईहलोकां मधला त्याचा प्रवास संपवितो. मृत्यू नंतर शरीरातील घटक द्रव्ये पंच महाभूतांत विलीन होतात:नाश पावत नसतात. आत्मा अजर  व अमर आहे. आत्मा परमात्मस्वरूपात एकरूप होईपर्यंत त्याचा प्रवास अखंड चालेला असतो. अनंत काळा पासून देहाच्या आश्रयाने आत्म्याचा हा प्रवास चालू आहे.मूत्यू म्हणजे दुसर्या जन्माचा प्रारंभ होय!
* लोभाचे वाटोळे झाल्या शिवाय ब्रह्म कदापि मिळणार नाही. पैशाचा मोह दूर करणे फार कठीन आहे.तो दुखाचा डोह असून,मद व मत्सर हे दोष त्यातल्या मगरी आहेत. लोभी माणूस आचार भ्रष्ट असतो. जेथे लोभ तेथे शांती नसते.   म्हणूनच श्री साई म्हणतात.. | नादा कुणाच्या लागू नको | जन्म पत्रिका पाहू नको..
Source : Marathi Article from Marathi Unlimited.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा