खा. सचिनने नाकारला बंगला
‘दिल्लीतील सरकारी बंगल्यात मुक्काम करणे म्हणजे करदात्यांचा पैसा वाया घालविण्यासारखे होईल’, असे म्हणत, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने राज्यसभेचा सदस्य म्हणून त्याला नवी दिल्लीत देण्यात आलेला सरकारी बंगला स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी खासदार म्हणून दिल्लीत आल्यावर स्वखर्चाने हॉटेलमध्ये राहणे मला आवडेल, असेही सचिनचे म्हणणे आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी सचिनने काही वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. तेंव्हा ते असे म्हणाले होते. सचिन तेंडूलकर यांनी सोमवारी शपथ ग्रहण केली होती अंड आता तो लंडनला रवाना झाला आहे.