12
” पसायदान ” एक सकारात्मक प्रार्थना .
सकारात्मकतेचे एक उत्तम उदाहरण पहावयाचे असेलतर संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना म्हणजे ” पसायदान”अतिशय नकारात्मक वातावरणात दिवसातील प्रत्येक क्षण या भावंडांनी व्यतीत केला पण या बाहेरील वातावर्नांचात्यांनी आपल्या विचारांवर कधीच पगडा बसू दिला नाही. आयुष्यात असह्य वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी भोगल्या पण तो एक संकेत समजून त्या भावंडांनी अद्ग्यात्म आणि तत्वज्ञानासारख्या सकारात्मक विचारांना जवळ केल. त्यामुळे ईतक्या नकारात्मक वातावरणात हि ते कमजोर अथवा दुबळे झाले नाही. उलट त्यांची सकारात्मक शक्ती सगळ्या त्रासाला मागे टाकत आणखी प्रबल झाली त्या शक्तीद्वारे सर्व विश्वाचे कल्याण चिंतणारे सकारात्मक वागणे म्हणजे ”पसायदान”त्यांनी जगापुढे एक आदर्श म्हणून ठेवले.
12