भारतात सुमारे दोन ते अडीच कोटी लोकांना हा विकार आहे. या विकाराला घेऊन समाजात अनेक गैरसमज आहे. कोड असलेल्या व्यक्तींकडे समाज विचित्र नजरेने बघतो. लग्नाबाबत नियम अधिकच कडक होतात. लग्न अशा व्यक्तींच्या बाबतीत एक मोठी समस्या ठरते. समाजात या समस्येविषयी जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. कोड असणार्या व्यक्तींना समुपदेशनाद्वारे मानसिक आधार देणे, या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे आवश्यक आहे.
पांढरे डाग किंवा कोड वैद्यकीयदृष्ट्या आजार नाही. समाजात मात्न पांढरे डाग असणार्यांच्या वाट्याला येते ती अवहेलना. त्वचेखाली रंगद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने पांढरे डाग येतात. यामुळे व्यक्तीच्या कोणत्याही क्षमतेत घट होत नाही. फक्त बाह्यरूप बदलते, मात्र त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनच उद्ध्वस्त करते. अशा व्यक्तींना मानिसक धक्क्यातून बाहेर काढून आत्मविश्वास मिळवून देणे महत्त्वाचे आहे. शरीरातील मेलॅनिन हे रंगद्रव्य तयार करणार्या मेलॅनोसाईट या पेशी हळूहळू नाहीशा झाल्यामुळे पेशींचा रंग पांढरा होत जातो. पांढरे डाग दिसताच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायला हवे. असे झाल्यास हा विकार पूर्णत: बरा होऊ शकतो. जुन्या विकाराला थोडा वेळ लागतो.
Source : Marathi Articles.