उद्योगाच्या बाबतीत पुढं असणार्या महाराष्ट्रातून उद्योगधंद्यांनी आता काढता पाय घ्यायला सुरूवात केली आहे. महिंद्रा, फोर्ड, मारुती सुझुकी आणि निस्साननंतर डीएसके मोटोव्हिल्स कंपनीही राज्याबाहेर जाण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्यामुळे उद्योग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मात्र याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप मित्र पक्ष करत आहे. सध्या महिंद्रा अँन्ड महिंद्रा, फोर्ड इंडिया, मारूती सुझुकी हे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. तर निस्सान मोटर्स ही कंपनी चेन्नईला जाण्याच्या तयारीत आहे. तर होंडा या कंपनीनंही आंध्रप्रदेशात जाण्याची तयारी चालवली आहे. दुचाकी बनवणारी देशातली अग्रगण्य कंपनी असलेल्या बजाज ऑटो आणि फोक्सवॅगन या जर्मन कंपनीनं देखील राज्याबाहेर आपले नवीन युनिट्स उभारलेत. आणि याला कारणीभूत ठरतंय ते राज्य सरकारचं नवं करविषयक धोरण.
2009 -10 या आर्थिक वर्षात राज्यातर्फे देण्यात आलेल्या या सवलतीमुळे जवळपास 400 कोटींचा महसूल बुडाला होता. तर 2010-11 मध्ये हा आकडा वाढून 2500 कोटींवर गेला होता. त्यामुळंच शेवटी नाईलाजास्तव करविषयक सवलतीच्या धोरणात सुधारणा करावी लागली असल्याचा अर्थ खात्याचा दावा आहे. हे जरी खरं असलं तरी राज्याबाहेर जात असलेल्या मोठ्या उद्योगांना रोखण्यासाठी या धोरणाचा पुनर्विचार राज्य सरकारला करावा लागणार आहे.
या कंपन्या जात आहे राज्याबाहेर
– महिंद्रा अँड महिंद्रा
– फोर्ड इंडिया
– मारुती सुझुकी
– निस्सान मोटर्स
– होंडा
Leave a Reply