सर्व कॉल्स होणार लोकल
Like
Like Love Haha Wow Sad Angry

मोबाईल फोनच्या स्वस्ताईने आणखी पुढचा टप्पा गाठला असून, लवकरच रोमिंग ही संकल्पना हद्दपार होणार आहे. सरकारने राष्ट्रीय दूरसंचार धोरण २0१२ (एनटीपी) ला मंजुरी दिली आहे. नव्या धोरणानुसार टेलिकॉम परवाने व स्पेक्ट्रम यांचा संबंध तोडण्यात आला आहे. एनटीपी २0१२ अंतर्गत ऑपरेटरना कोणत्याही तंत्रज्ञानावर आधारित सेवा हवेच्या लहरींचा वापर करून देता येणे शक्य असून, यापुढे र्मयादित फ्रिक्वेन्सी बँड वापरण्यासाठी विशिष्ट सेवा वापरण्याची गरज राहणार नाही. सध्या जीएसएम व सीडीएमएसाठी विशिष्ट फ्रिक्वेन्सी वापरल्या जातात व त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. याशिवाय, संपूर्ण देशात एकच मोबाईल नंबर वापरता येणार आहे. म्हणजेच शहर किंवा राज्य बदलले तरी, नंबर बदलण्याची गरज भासणार नाही. स्पेक्ट्रम परवान्याचा पुन्हा एकदा लिलाव करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: