साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली भाविकांची बस हैदराबाद-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जळकोटनजीक आज पहाटे अडीचच्या सुमारास पुलावरून सुमारे ४0 फूट खोल दरीत कोसळली. यात २७ जण जागीच ठार तर दोघांचा सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. १६ जण जखमी झाले असून, १0 गंभीर आहेत. हे सर्व जण हैदराबादचे आहेत.