वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या १५ मे रोजी होणार्या विनंतीवरून व प्रशासकीय बदल्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चंद्रकांत ठाकरे आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक रंगराव काळे यांनी दिली.
वाशिम जि.प. अंतर्गत प्राथमिक शाळांमधील प्रशासकीय, विनंतवरून करावयाच्या बदल्या ७ व १४ मे रोजी दोन टप्प्यात करावयाचे जि.प. शिक्षणाधिकारी प्राथमिक काळे यांनी पूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर शासनाकडून आलेल्या सुधारित शासननिर्णयानुसार या दोन टप्प्यात होणार्या बदल्या १५ मे रोजी घेण्याचे ठरवण्यात आले होते. परंतु, दरम्यान, प्रशासकीय बदल्यांच्या प्रक्रियेबाबत शिक्षकांकडून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेसंदर्भात न्यायालयाने राज्यशासनाला या बदल्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाशिम जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती ठाकरे व शिक्षणाधिकारी प्राथमिक काळे यांनी घेतला आहे.
या बदल्या होणार असल्यामुळे जि.प.च्या शाळांवरील शिक्षक चांगलेच धास्तावले होते. त्यांना या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे.