महिलांनी तोकडे कपडे बदल्याऐवजी पुरुषांनी आपले तोकडे विचार बदलण्याची गरज आहे, असे महिला संघटना म्हणत असतानाच हरियाणातील महिला व बालविकास विभागाने सरकारी कार्यालयात ‘नोट जिन्स..नो टॉप..चा फतवा काढला आहे. सोबतच पाश्चात्य पोशाख ‘ऑड’ वाटतो त्यामुळे कार्यालयीन शिस्तीचा भंग होत असल्याचेही म्हटले असल्याने नवा वाद पेटला आहे.
सरकारी कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचार्यांनी कार्यालयात जीन्स व टी-शर्ट हा पेहराव करून न येता, शालीन कपडे घालून यावे,असे महिला, बाल कल्याण विभागाच्या तत्कालीन संचालक रेणू फुलिया यांनी आदेशात म्हटले आहे. १८ एप्रिल रोजी हा आदेश काढलेला आहे. विशेष म्हणजे या आदेशावर रोष व्यक्त करताना एका कर्मचार्याने शालीन कपडे म्हणजे फक्त साडी, दुपट्टा किंवा पॅन्ट व शर्ट एवढेच होतात काय किंवा तसे ते असल्याचे कुठल्या कायद्यात नमूद आहे, अशी विचारणाही केली आहे.
या आदेशावर निष्कारण वाद निर्माण केला जाऊ नये, असे आवाहन करताना मिहला व बालकल्याणमंत्री गीता भुक्कल म्हणाल्या की, आज प्रत्येक विभागाचा स्वत:चा ड्रेस कोड असतो.