मस्तिष्क – क्षमता – विकास.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
7
मस्तिष्क – क्षमता – विकास.

head and its workingआपले शरीर हे एक वाहन आहे. त्या वाहनाचा चालक म्हणजे मेंदू { ब्रेन } त्याला ते चालकाचे कार्य मिळाले आहे. साधारणत:आपल्या मुठी एवढा मेंदू संपूर्ण आयुष भर इंजींचे काम करीत असतो. मेंदूचे वजन साधारणत:१४०० ग्रॅम असते. त्यात दोन भाग असतात. आपल्या आयुष्यात आपण मेंदूचा केवळ ७% भाग वापरतो. उर्वरित ९३% भाग सर्वसाधारण मनुष्य वापर करीत नाही. मेंदू मध्ये प्रचंड शक्ती असते. त्याचे सर्व साधारण कार्य म्हणजे भावनीक कार्य, स्मरण ठेवणे, चिंतन करणे, कल्पना करणे असे त्याचे वेगवेगळे भाग वेगवेगळे कार्य करतात. जसे शरीराच्या प्रत्येक अंगाला व्यायाम आवश्यक असतो, तसेच मेंदूला चालना देण्यासाठी त्यावर जोर देणे आवश्यक असते. चार्ल्स डार्विन च्या सिद्धांता नुसार मेंदूचा कमी वापर केल्यामुळे त्याची  कार्यक्षमता कमी होते व अधिक वापर केल्यास अधिक कार्यक्षमता वाढते असे आहे. त्यासाठी काही व्यायाम आवश्क असतो,

*  प्रत्येक गोष्टीचा सविस्तर विचार करण्याची प्रवृत्ती जोपासणे.
* मेंदूला बसल्या जागेवर फिरायला नेणे. प्रवासातील काही आठवणी लक्षात, आणने. टेलिफोनची डायरीतील नंबर आठवणे, ई.
*  नेहमी सकारात्मक दृष्टीकोन असणे, सात्विक अध्यात्मिक वातावरणात असल्याचे कल्पना करणे, प्रतेकाने आपल्या प्रतिकार शक्ति नुसार जोर देणे. जरुरीचे असते.

आपल्या मेंदूत बरेच काही चालले असते. हा एक निसर्गाचा संगणक आहे, खरे म्हटले तर आपल्याला ईश्वराने दिलेला वरदानच आहे, त्याच्या अदभूत शक्तीच्या विकासातूनच मानवाने निरनिराळे शोध लावून, हे संपूर्ण विश्व उन्नतीच्या शिखरावर पोचविले आहे. मोठमोठे अविष्कार घडवून आणले आहेत. किती सार्या गोष्टी एवढासा मेंदू अगदी व्यवस्थित साठवून ठेवतो.  पण कधी खूप ताण वाढला कि ”ट्राफिक जाम” सारखी परिस्थिती निर्माण होते. तरी त्यावर नियंत्रण मिळवून मेंदू विशिष्ट वेळी विशिष्ट गोष्टी सांगत असतो. असा दावा संशोध्कांनी केला आहे वाशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकाच्या एका पथकाने जर्मनीतील युनिव्हर्सिटी सेंटर सहयोगाने केलेल्या अध्ययनात हि बाब स्पष्ट झाली आहे मेंदूतील काही संदेशयंत्रणा ५ ह्रर्टझवर काम करतात. तर काही ३२ आणि ४५ हर्टझवर काम करतात. घड्याळाचे तिनही काटे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या गतीने चालतात, त्याच पद्धतीने मेंदूची कार्य पद्धती आहे. चुंबकीय माध्यमातून केवळ पेशींच्या हालचालींचा अंदाज घेता येतो. सूक्ष्म हालचाली मात्र नोंदविता येत नाहीत. मेंदूतील काही संकेत एका सेकंदात ५०० वेळा घडत असतात. असे या  संशोधनात आढळून आले आहे. यासाठी जवळ जवळ ४३ जणांच्या मेंदूतील घडामोडींचा ”मग्नेटोएन्सीफ्यलोग्राफी” या तंत्राद्वारे अभ्यास करण्यात आला आहे.
Source : Marathi Articles.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
7
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu