वन विभागातर्फे ६ मे रोजी पूर्व विदर्भात जंगलाच्या पाणवठ्यावर वन्यप्राणी प्रगणना करण्यात आली आणि त्यानुसार या भागात ७० वाघ असल्याचे आढळून आले. याशिवाय, ६१ बिबटे आणि ४६७६ चीताळही मोजण्यात आले.
वेगवेगळ्या क्षेत्रातील वन्य प्राण्यांची संख्या अशी, ताडोबा अंधारी वाघ्र प्रकल्प कोर क्षेत्रात वाघ ४५, बिबटे १२, रानकुत्रे ९७, अस्वल १५२, रानमांजर १८, गवा ७६३, सांबर ७५१, चितळ १२६६, भेडकी ११७, चौसिंगा ६१, रानडुक्कर ८२८, नीलगाय १५६, चांदी अस्वल ११, खवल्या मांजर ४. पेंच वाग्घ्र कोवर प्रकल्पात वाघ १०, बिबट ८, रानकुत्रे ८१, अस्वल १९, कोळ ६२, रानमांजर १०, गवा ३३१, सांबर ५३३, चितळ १३२४, भेडकी ३६, चौसिंगा ५, रानडुक्कर ७९६, नीलगाय १०६, चांदी अस्वल ३, खवल्या मांजर १, पेंच वाघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात वाघ २, बिबटे ४, रानकुत्रे ५४, अस्वल ३, कोल्हे २, गवा ४९, सांबर १२५, चितळ ३४५, भेडकी ३७, रानमांजर २४३, नीलगाय ७१, टिप्पेश्वर अभायरण्यात वाघ ५, अस्वल २, रानकुत्रे १, कोल्हे २७, रानमांजर २, चितळ ६९, भेडकी २१, रानमांजर २००, नीलगाय १०२, खवल्या मांजर १, नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बिबट ६, रानकुत्रे ४६, अस्वल ८५, लांडगे १९, तडस २, रानमांजर ९, गवा ३११, सांबर ३६, चितळ ३०, चौसिंगा १, रानडुक्कर १५१, नीलगाय २७२, मूषक हरीण १.
|