भारतातील राजकारण्यांनी लोकसभेचा आणि विधानसभेचा उपयोग जनतेचा हितासाठी न केल्याने जन समाजाचे प्रश्न तसेच राहिले. त्या विपरीत परिणाम होवून देशात नक्षलवादास सुरवात झाली. आज गुरुवारी येथील विश्राम गृहावर आयोजित पत्रकार परिषदेत अण्णा बोलत होते. लोकपाल व लोकयुक्ता बिलाला समर्थन मिळण्यासाठी ते सध्या राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. अण्णा पुढे म्हणाले, देश्याच्या तिजोरीत भ्रष्टाचार वळवीसारखा चिकटला आहे. शाशनाच्या तिजोरी जमा होणारा जनतेचा पैसा लोकसभेत व विधानसभेत काही दरोडेखोर लुटून नेत आहेत.
टीम अन्नामधील त्यांचे सहकारी केजरीलाल व किरण बेदी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न उपस्तीत केले असता अण्णा म्हणाले, केजरीलाल व बेदीच्या भ्रष्टाचारचा एक जरी पुरावा मला सापडला तर मी क्षणाचाही विलंब न करता त्यांना सोडून देईल.
आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.
खालील बटण लाइक आणि शेअर करा
Loading Comments...
%d
तुमचा अनुभव सुधारण्यासाठी ही वेबसाइट कुकीज वापरते. आपण ही साइट वापरणे सुरू ठेवल्यास, आपण त्यास सहमती देता.
1 Comment. Leave new
kam kami ani tika jast…………….. kay honar ya deshach…. dev jane…