अण्णा-बाबा यांच्या संघटनांमुळे आधीच अडचणीत आलेल्या टीम अण्णात आज मुफ्ती शमीम काझमी या मुस्लिम नेत्याला बडतर्फ करण्यावरून उभे मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले. कोअर कमिटीच्या बैठकीचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप या मुस्लिम नेत्यावर ठेवण्यात आला. त्याने आरोपाचा इन्कार करीत टीम अण्णा सोडत असल्याचे जाहीर केले आणि टीम अण्णा मुस्लिम विरोधी असल्याचा ठपकाही ठेवला. ही नाट्यमय घटना आज टीम अण्णाच्या कोअर समितीने घेतलेल्या बैठकीच्या निर्णयापेक्षाही जास्त वेधक ठरली, हे विशेष!
रविवारी दुपारी नोएडा येथे टीम अण्णाच्या कोअर समितीची बैठक सुरू असताना ही नाट्यमय घटना घडली. मुफ्ती शमीम काझमी, टीम अण्णाच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेतील आरंभापासूनचे साथीदार, हे कोअर समितीच्या बैठकीचे छुपे रेकॉर्डिंग करीत असल्याचे आढळले. त्यांच्यावर हा आरोप होताच काझमी यांनी अण्णांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या बैठकीतून तडाख्याने बाहेर धाव घेतली आणि बाहेर जमलेल्या पत्रकारांसमोर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. आम्ही त्यांना रंगेहाथ पकडले, असा दावा टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्यावरच काझमी यांचा मुख्य रोख होता.
3 Comments. Leave new
kay challay raja tikade……
jai team anna……………
ye bachonaka khel nahi hai….. A . . n … n …A ji….