मला बुद्धी ना ज्ञान काहीच नाही \ नसे धारणायोग तो हि न काही \
न भक्ती तशी मंत्र विद्या हि काही \ तुझ्या विन अंबे न जाणेच काही\\१\\
शरीरास भोगादी होणार आहे \ तयाची क्षिती मी कदापि न वाहे \
देह धारणा साध्य होवो कशीही \ तुझ्या विन अंबे न जाणेच काही \\ २ \\
तुझ्या कारणे देह दुखित झाला \ बसावे गमे जावूनी काननाला \
सुचेना मला बुद्धी आणिक काही \ तुझ्या विन अंबे न जाणेच काही\\३\\
मला संगती सज्जनाची असू दे \ मला स्वार्थ चिंता कदापि नसू दे \
मला दे रती त्व पदाची सदाही \ तूझ्या विन अंबे न जाणेच काही-\\४\\
तुझे नाम वाचे सदा वावरावे \ स्वरूपी तुझ्या माणसे म्या रमावे \
नसे मागणे या वरा वीण काही \ तुझ्या वीण अंबे न जानेच काही \\५\\