सुविचार – पं. श्रीराम शर्मा.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

This post contain shri pandit sharma suvichar sangrah. very thoughtful suvichars from Dr pandit sharma. Quotes of Dr pandit sharma.

सुविचार –        पं. श्रीराम शर्मा.

* त्याग आणि तपस्या जीवनाचा खरा शृंगार आहे.
* स्वत: स्वाध्यायात प्रवृत्त होऊन, दुसर्यांनाही याकरिता प्रेरित करणे, एक अनमोल सेवा आहे.
* विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही.
* ईतरांची वाट पाहण्याची जर सवय असेल तर तुम्ही मागेच राहाल.
* आपण वेळेचे रक्षण कराल तर वेळ आपली रक्षा करेल.
* श्रेष्ठ जीवनाचा आधार, श्रेष्ठ चिंतन होय.
* ज्ञानाची सार्थकता आचरणात आहे.
* जे जीवनाशी प्रेम करतात.त्यांनी आळसात वेळ घालू नये.
* दु:खाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यातून पाउस पडू लागेल.
* ईश्वरी संतान होणे म्हणजे, त्यांच्या गुणांचा प्रत्यक्ष करणे होय.
* निश्चयात विजय अवश्य  आहे.
* साधेपणात मोठे सौंदर्य आहे, जे साधे असते ते सत्याच्या समीप असते. सत्याची नाव डोलते बुडत नाही.
* संकटे नेहमी आपल्या बरोबर पुरस्कार घेऊन येतात.
* नेहमी सर्वांच्या सदगुणांना पहाल तर सर्व गुण संपन्न बनाल.
* हिरेतुल्य जीवनास कवडीतुल्य बनवू नका.
* अधिकाराचे हक्कदार तेच आहेत – ज्यांना कर्तव्यां वर प्रेम आहे.
* वाईट सवयींचा दास बनाल तर उदास राहाल.
* सच्च्या  प्रेरणेला काट्यांची पर्वा नसते.
* मनुष परिस्थितीचा दास नाही, त्यांचा निर्माता आहे.
* प्रसंन्न राहाल तरच प्रश्न मुक्त व्हाल.
* व्यक्तीची वास्तविक पुंजी धन नाही, श्रेष्ठ विचार आहेत.
* नम्र बनाल तरच सर्व नमन करतील.
* तुमची आजचे खोटे बोलणे हे पुन्हा पुन्हा खोटे बोलण्यास भाग पाडतील.
* दुर्बल व आळशी मन शक्तिशाली विचार निर्माण करू शकत नाही.
* दुसर्यांचे दोष आपण आपल्या मनात ठेऊ तर ते लवकरच आपले होऊन बसतील.
*  जेथे नाही योग्य विचार , तेथे व्यर्थ धनाचे भांडार.
* संसारात सर्वात मोठी सेवा म्हणजे स्वत:चा सुधार.

Source:  Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu