पश्चिम बंगालच्या पाठ्यपुस्तकातून कार्ल मार्क्स हद्दपार! जर्मन तव्तावेत्ता कार्ल मार्क्स याचा अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या तृणमुल सरकारच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम समितीने घेतला आहे.
मार्क्सवादी राजवटीत पश्चिम बंगालच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात साम्यवादाचे जनक कार्ल मार्क्स यांच्या एका विशेष सिद्धांताला महत्व देण्यात आले आहे. भूतकाळात घडलेला इतिहास नसून आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, हे महाव्ताचे आहे. वर्षभरापूर्वी राज्यात ३४ वर्षच्या कम्युनिस्ट शाश्नाचा पराभव होवून तृणमूल सरकार ममता सत्तेत येताच मार्क्सवादी विचारधारणा त्यांच्या निशाण्यावर होती. त्यांनी कार्ल मार्क्स व त्याच्या अनुयांवर अनेकदा टीकाही केली होती. तसेच ममताच्या या निर्णयावर डाव्यांची फार टीकाही झाली आहे.