जगात कुठेही असलात आणि तुमच्यासमोर संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन किंवा अन्य कोणतेही संगणकीय उपकरण इंटरनेट सुविधेसह असेल तर तुमच्या फाइल्स चुटकीसरशी मिळू शकतील, अशी सोय आता गुगलने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी गुगलने आपली क्लाउट स्टोरेज सर्विस ‘गुगल ड्राइव्ह’ मंगळवारपासून सुरू केली. या सेवेच्या गुगलच्या या ड्राइव्हमध्ये सेव्ह केलेले कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेट, फोटो, व्हीडिओ तसेच गाणी तुम्ही जगातील कोणत्याही कोप-यात मिळवू शकाल.
उदाहरणच द्यायचे झाले तर या ड्राइव्हमध्ये सेव्ह केलेल्या फाइल्स आपण गुगल प्लसला अटॅच करू शकतो, तसेच जी-मेल अकाउंटमधील मेललाही तो जोडला जाऊ शकेल.