Banarasi Aloo :
How to Make Banarasi aloo : Bring a saucepan of water to a boil and add the potatoes. Simmer until potatoes are slightly soft. In a separate pan heat oil and add fennel, cumin, tamarind paste, turmeric, garam masala, cardamom powder in a tbsp of oil.
साहित्य :
पाव किलो बटाटे, चार टेबलस्पून कोथिंबीर, दीड टेबलस्पून पनीरचा चुरा, दीड टेबलस्पून मैदा, हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ, धने पूड चवीनुसार, एक चमचा जिरे पूड, लिंबाचा रस एक चमचा, थोडे तीळ, दोन कांदे वाटलेले, एक चमचा आलेची पेस्ट, एक चमचा लसणाची पेस्ट, पाच काजू, तीन चमचे खसखस भिजवून वाटावे, थोडी साय.
कृती :
बटाटे उकडल्यानंतर साल काढून किसून घ्यावीत. या लगध्यात कोथिंबीर, पनीरचा चुरा, मैदा, हिरवी मिरचीची पेस्ट, धने, जिरे पूड, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मालून घ्यावे, तयार झालेल्या लाग्ध्याचा अंडाकृती आकार करून तिळात हे गोळे घोळवावे नंतर तेलात तळून घ्यावेत, दुसरया भांड्यात कांदा, आल, लसून यांची पेस्ट टाकून परतावी. लाल न करता खसखस आणि काजूची पेस्ट घालावी. साय, एक कप पाणी आणि मीठ घालावे. ग्रेव्हीचा रंग पांढराच राहिला पाहिजे. रश्श्याला उकळी आल्यानंतर त्यात तळलेले अंडाकृती गोळे घालावे. पुन्हा उकळू नये.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर .नागपूर ९